Moves on to Dissolve Goa Assembly | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

गोवा विधानसभा विसर्जनाची तयारी' दिल्लीत हालचाली सुरु, वरिष्ठ अधिकारी पाठवणार

अवित बगळे
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

गोव्यातील  मंत्र्यांनी दर बुधवारी आढावा बैठकीसाठी एकत्र येण्याचे ठरवले होते. समन्वयासाठी अशी बैठक असेल असे सांगण्यात आले होते. पहिल्या बैठकीनंतर मात्र मंत्र्यांचा उत्साह मावळत गेला. दुसऱ्या बैठकीचा उपचार पार पाडण्यात आला आणि तिसरी बैठकच काल झाली नाही. एवढेच नव्हे महत्वाचे निर्णय होण्यासाठी लक्ष लागून राहिलेली नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई अध्यक्ष असलेल्या नगरनियोजन मंडळाची बैठकही काल झाली नाही. त्यामुळे सारे काही शुक्रवारच्या बैठकीवर अवलंबून आहे असे दिसते.

पणजी : राज्यातील राजकीय पेच निवळत नसल्याचे दिसल्याने वेळ आली तर विधानसभा विसर्जित करण्याची तयारी दिल्लीत सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उद्या शुक्रवारी घटक पक्षांचे नेते व सहकारी मंत्र्यांशी कोणता संवाद साधणार याकडे सर्वांची लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसने चारेक हजार जणांच्या समावेशाने बुधवारी सायंकाळी उशिरा पणजीत चार किलोमीटरचा मोर्चा काढून, मोठी जाहीर सभा घेतल्यानंतर या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

गोव्यातील  मंत्र्यांनी दर बुधवारी आढावा बैठकीसाठी एकत्र येण्याचे ठरवले होते. समन्वयासाठी अशी बैठक असेल असे सांगण्यात आले होते. पहिल्या बैठकीनंतर मात्र मंत्र्यांचा उत्साह मावळत गेला. दुसऱ्या बैठकीचा उपचार पार पाडण्यात आला आणि तिसरी बैठकच काल झाली नाही. एवढेच नव्हे महत्वाचे निर्णय होण्यासाठी लक्ष लागून राहिलेली नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई अध्यक्ष असलेल्या नगरनियोजन मंडळाची बैठकही काल झाली नाही. त्यामुळे सारे काही शुक्रवारच्या बैठकीवर अवलंबून आहे असे दिसते.

याबाबत दिल्लीत चौकशी केल्यावर विधानसभा विसर्जनाच्या राजकीय पर्यायाची चाचपणी सुरु झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने विधानसभा विसर्जनानंतर राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना सल्लागार म्हणून काम करण्यासाठी १९८६ वा तत्पूर्वीच्या बॅचच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. त्याशिवाय वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचाही याच कारणास्तव शोध सुरु कऱण्यात आला आहे. 

सध्याचे राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. विधानसभा बरखास्तीनंतर राज्यपालांसाठी दोन अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ नेमण्याची योजना आहे ‌. याबाबत केंद्रीय गृह  मंत्रालयातील माहितगार सूत्रांनी सांगितले, की गोव्यात पाठवण्यासाठी वरिष्ठ व अनुभवी अधिकाऱ्यांचा शोध सुरु झाला ही गोष्ट खरी असली तरी अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय व्हायचा आहे.

दिल्लीत या हालचाली सुरु असताना राज्यात मात्र मुख्यमंत्री आपल्याकडील खाती सहकारी मंत्र्यांना देणार अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळाची बैठक एम्समध्ये होणार की नाही याबाबत कोणी काही सांगत नसले तरी मुख्यमंत्र्यांकडून भेटीसाठी बोलावणे आल्याचे काही जणांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हे नेते, मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटण्यास जाणार आहेत.
 
संबंधित लेख