mortal remains of vajpeyi in karad | Sarkarnama

वाजपेयींच्या अस्थींचे शनिवारी प्रीतिसंगमावर विसर्जन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे उद्या (गुरूवारी) साताऱ्यात शिरवळ येथे आगमन होणार आहे. तर शनिवारी (ता. 25) दुपारी कऱ्हाडला प्रीतीसंगम येथे अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे. 

सातारा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे उद्या (गुरूवारी) साताऱ्यात शिरवळ येथे आगमन होणार आहे. तर शनिवारी (ता. 25) दुपारी कऱ्हाडला प्रीतीसंगम येथे अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे. 

पुण्यावरून अस्थिकलश सकाळी दहा ते अकरा यावेळेत शिरवळ येथे येणार आहे. तेथे तो पुष्पांजली अर्पण करण्यासाठी ठेवण्यात येईल. तेथून खंडाळा, सुरूर, भुईंज, पाचवड येथे दर्शनासाठी ठेवला जाईल. दुपारी एक ते दोन यावेळेत हा अस्थिकलश साताऱ्यातील राजवाडा येथे आणून तेथे पुष्पांजली अर्पण केली जाणार आहे. यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहून अस्थिकलशाचे दर्शन व मानवंदना कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 

त्यानंतर नागठाणे, उंब्रज, तासवडे (टोलनाका), वहागाव या ठिकाणी ठेऊन इस्लामपूरमार्गे तो सांगलीकडे नेण्यात येणार आहे. शनिवारी (ता. 25 ऑगस्ट) सकाळी दहा वाजता हा अस्थिकलश कऱ्हाड येथील महात्मा गांधी पुतळा येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कऱ्हाडातील शाहू चौक, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, चावडी चौक, आझाद चौक या मार्गावरून अस्थिकलश प्रीतिसंगम येथे ठेवण्यात येईल. दुपारी दोन वाजता प्रीतिसंगम येथे या अस्थींचे विसर्जन कृष्णा कोयना संगमावर करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी दिली. 
 

संबंधित लेख