more and tilekar | Sarkarnama

जबाब मिलेगा, करारा जबाब मिलेगा : वसंत मोरे यांचे प्रत्युत्तर

उमेश घोंगडे
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

पुणे : येवलेवाडी विकास आराखड्याच्या विषयावरुन बदनामी केल्याचा आरोप करीत आमदार योगेश टिळेकर यांनी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर 10 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. बदनामी केल्याप्रकरणी नगरसेवक मोरे यानी आमदार टिळेकर यांची लेखी माफी मागावी व ती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावी, असे नोटीशीत म्हटले आहे. 

या संदर्भात बोलताना मोरे म्हणाले, आता होऊनच जाऊ दे. अजून 30 कोटींच्या नोटीसा तयार ठेवा, असे आव्हान मोरे यांनी दिले. मोरे म्हणाले, मी आमदार टिळेकर यांच्या इतका श्रीमंत नक्की नाही. त्यांच्या इतका मोठा पण नाही. मात्र मी खरा आहे. कर नाही त्याला डर कसली, असे आव्हान मोरे यांनी आमदार टिळेकर यांना दिले आहे. वसंत मोरेचे काळीज वाघाचे आहे. जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा, असे आव्हान मोरे यांनी दिले आहे. 

संबंधित लेख