More than 100 workers face externment action in Malegaon | Sarkarnama

हक्काच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीने नेते चिंतेत मालेगाव निवडणूकीत शंभर जणांवर हद्दपारी

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 एप्रिल 2017

मालेगावच्या निवडणुकीला गोंधळाचा इतिहास आहे. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रांवर सशस्त्र बंदोबस्त असेल. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

नाशिक :  मालेगाव महापालिका निवडणूकीची प्रक्रीया सुरु होताच वाद, दहशत अन् गुन्हेगारीचा प्रभाव राहिलेल्या राजकारणालाही हादरे बसु लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या हजार जणांना नोटीसा पाठवल्या आहे. शंभर जणांना हद्दपार करण्याचे काम सुरु झाल्याने राजकीय नेते, इच्छुकांच्या चिंतेत भर पडली आहे. यात काहींच्या निवडणूकीची गणिते बिघडणार आहेत.  

तडापारीच्या प्रस्तावांत नगरसेवक रफीक शेख, विश्व हिंदू परिषदेचे मच्छींद्र शिर्के यांसह एमआयएम, काँग्रेससह विविध पक्षाचे नेते आहेत. निवडणूक शांततेत होण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. सराईत गुन्हेगार व समाजकंटकांविरूध्द व्यापक कारवाई होणार आहे. शंभरपेक्षा अधिक जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. 55 प्रस्ताव कारवाईसाठी पाठविले आहे. एक हजारापेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई होईल असे पोलिस उपअधिक्षक गजानन राजमाने यांनी सांगितले. 

मालेगावच्या निवडणुकीला गोंधळाचा इतिहास आहे. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रांवर सशस्त्र बंदोबस्त असेल. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व कायदा-सुव्यवस्था तसेच शांततेला बाधा पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुध्द कुठलाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करु, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी दाखलेबाज गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे. हे सर्व कार्यकर्ते राजकीय नेत्यांच्या आवडीचे असतात. त्यांची मतदानासाठीही खुप मदत होते. आता ही सगळी गणिते बिघडण्याची शक्यता आहे. 
 

संबंधित लेख