morcha in akola | Sarkarnama

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

अकोला : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व नाफेडद्वारा तुरीची खरेदी व देयके सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (1 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. 

अकोला : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व नाफेडद्वारा तुरीची खरेदी व देयके सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (1 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. 

कर्जंमुक्तीच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला आहे. तूर खरेदी मध्येही सरकारी यंत्रणेने प्रचंड घोळ घालून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचेच काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी सुरुवातीपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती द्यायची आहे, अशा आशयाची वक्तव्ये करीत असताना कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार ठरला आहे अशी टीका विविध शेतकरी संघटना करत आहेत. 

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमुक्त करावे, सरकारने शेती मालाच्या व्यापारावरील सर्व बंधने उठवून बाजारातील सरकारी हस्तक्षेप थांबवावा, शेती मालाचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यात शुल्क वाढवणे, निर्यातीवर बंदी अथवा निर्बंध लादने, चढ्या दराने परदेशातून आयात करने, आंतरराज्य वाहतुकीवर बंदी घालने, व्यापारी साठ्यांवर मर्यादा घालणे, विक्री किमतीवर मर्यादा घालणे आदी उपाय बंद करावेत, शेतकऱ्यांना खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ मिळू द्यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, सतीश देशमुख, ललीत बहाळे, अविनाश नाकट, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. 
 

संबंधित लेख