Mopalwar tapes investigation started by anti corruption baeuroe | Sarkarnama

मोपलवारांच्या टेप्सची  अँटी करप्शनतर्फे चौकशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई :  समृद्धी महामार्ग प्रकल्पासंबंधी राधेश्‍याम मोपलवार यांच्या कथित संभाषण प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. 
या ध्वनिफितीत पैशांच्या देवाण - घेवाणीबाबत कथित चर्चा झाल्याने एसीबीने तपासाला सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील टेप्सच्या ट्रान्स्क्रिप्टची पडताळणी करणार आहेत. त्यानंतर इतर पुरावेही गोळा करण्याचे काम केले जाईल, असे सांगण्यात आले. 

मोपलवार यांच्या वादग्रस्त ऑडिओ प्रकरणाचे तीव्र पडसाद विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच उमटले होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मोपलवार यांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. जमीन व्यवहारासाठी कोट्यवधींच्या देवाण-घेवाणीबाबत ते एका व्यक्‍तीशी बोलत असल्याची सीडी आणि सुमारे 450 कॉल्स रेकॉर्डसंदर्भातील कागदपत्रे मुंडे यांनी सभागृहात सादर केली होती. सरकारी अधिकाऱ्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध स्वतःहून चौकशी करण्याचे अधिकार एसीबीला आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित लेख