monika rajale about pankaja munde | Sarkarnama

पंकजा मुंडेंची माझ्या मतदारसंघावर कृपादृष्टी, म्हणून निधी आणण्यात अडचण येत नाही! 

राजू घुगरे 
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

एखाद्या प्रश्नासंदर्भात आपण मुंबईत बैठक घेतली, तर इकडे विरोधक जागे होत निवेदने देण्याचा सपाटा लावतात. स्व. मुंडेंसारख्या लोकनेत्यावर आरक्षणाच्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोप करण्याचाही प्रयत्न होत आहे. मात्र सुज्ञ जनतेला सर्व ठावूक आहे. 
-मोनिका राजाळे, आमदार 

अमरापूर (जि. नगर) : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची  शेवगांव पाथर्डी  मतदारसंघावर कृपादृष्टी आहे, म्हणून निधी आणण्यास फारशी अडचण येत नाही. चार वर्षात दोन्ही तालुक्‍यात बंधारे, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालये यासह अनेक प्रलंबीत प्रश्न प्रामाणिक मार्गी लावल्याचे आमदार मोनिकाताई राजाळे यांनी सांगितले. 

ढोरजळगाव - ने (ता. शेवगाव) येथील त्रिमुर्ती शिक्षण संकुलाच्या प्रांगणात आज झालेल्या पंकजा मुंडेंच्या सभेत त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. 
मंचावर खासदार दिलीप गांधी, उदयोजक अमित पालवे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते. 

मुंडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत ढोरजळगाव शे ते वडुले, ढोरजळगाव ने ते बडे वस्ती या सुमारे कोटी रुपये खर्चाच्या रस्त्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी मुंडे म्हणाल्या की, ग्रामविकास खात्यामुळे लोकांचे आशिर्वाद कमावता येतात. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेली स्वप्नही पूर्ण करता येत असल्याने मी नशीबवान आहे. जिल्हयातील सर्वाधिक निधी आपण शेवगांव पाथर्डी मतदारसंघासाठी केवळ आमदार मोनिका राजळे यांच्यामुळे उपलब्ध करुन दिला. 
 

संबंधित लेख