monika hargude resigns | Sarkarnama

मोनिका हरगुडे यांचा उपसभापतिपदाचा राजीनामा

नितीन बारवकर
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

शिरूर : पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंचायत समितीतील इतर सहकारी सदस्यांनाही उपसभापतिपदावर संधी मिळावी, यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर : पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंचायत समितीतील इतर सहकारी सदस्यांनाही उपसभापतिपदावर संधी मिळावी, यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

 
पंचायत समितीच्या दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत हरगुडे या सणसवाडी गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून आल्या होत्या. सभापतीपदावर प्रथम सुभाष उमाप व उपसभापतिपदावर हरगुडे यांची वर्णी लागली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात उमाप यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसभापती बदलाच्या चर्चेला वेग आला होता. या पार्श्‍वभूमीवर हरगुडे यांनी सभापती विश्वास कोहकडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, संचालक आबाराजे मांढरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, पंडित दरेकर, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे व जयमाला जकाते उपस्थित होते. 
सुभाष उमाप यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी मोनिका हरगुडे यांचा उपसभापतिपदाची राजीनामा अपेक्षित होता. उमाप यांनी राजीनामा देताना, ती सल बोलूनही दाखवली होती. तथापि, त्यांचा राजीनामा लांबणीवर पडल्याने "उपसभापती' पद मिळविण्यास इच्छुक असलेल्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांना वेग आला होता.

पंचायत समितीवर "राष्ट्रवादी' चे बहुमत असल्याने अनेकांनी आपापल्या परीने "फिल्डींग' लावून नेत्यांशी संधानही साधले होते. त्यामुळे सौ. हरगुडे यांच्या राजीनाम्यानंतर आता उपसभापतिपदावर कुणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित लेख