Mohol NCP's Agitation against Fuel Hike | Sarkarnama

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने घातला जागरण गोंधळ  

चंद्रकांत देवकते 
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

देशासह राज्यात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्य माणूस हैराण होत आहे . त्यासाठी सरकार कोणताही सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सरकारचेच जागरण गोंधळ घालण्याचा निर्णय घेतला

मोहोळ (जि . सोलापूर) सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने  तहसील कार्यासमोरच मुख्यमंत्री  देंवेंद्र फडणीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा ठेऊन सरकारचेच जागरण गोंधळ घातला.

देशासह राज्यात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्य माणूस हैराण होत आहे . त्यासाठी सरकार कोणताही सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सरकारचेच जागरण गोंधळ घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जागरण गोंधळाची मंडपात परंपरेप्रमाणे पुजा मांडण्यात आली. नंदा  पाटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांची मुरळ्यांसह जागरण गोंधळ पार्टी बोलाविण्यात आली. 

यावेळी दिवटी पेटवून त्यावर नगराध्यक्ष रमेश बारसकर तेल घालत बसले. या जागरण गोंधळात नंदा पाटोळे यांनी अतिशय विनोदी पध्दतीने इंधन दरवाढीविरोधात गीते व सवाल जबाबातुन व संवादातून  सरकारचे वाभाडे काढले. 

यावेळी जागरण गोंधळाच्या मंडपात नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह आयोजक राष्ट्रवादीने शहर कार्याध्यक्ष नागेश चंद्रकांत बिराजदार, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नागेश साठे, सोलापुर जिल्हा निरीक्षका निर्मला बावीकर, शहर अध्यक्ष दाजी गाढवे , युवक शहराध्यक्ष एजाज तलफदार, महिला शहर अध्यक्षा यशोदा कांबळे, पंचायत समिती सदस्या सिंधुताई वाघमारे, कामीनी चोरमले, नंदा बनसोडे, सुनीता धोत्रे, वर्षा दुपारगुडे, संतोष वायचळ, संतोष सुरवसे, आण्णा फडतरे, सुरेश कांबळे, रुपेश धोत्रे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते . 

संबंधित लेख