mohan joshi eyes for loksabha ticket | Sarkarnama

मोहन जोशींचा कर्तव्य व त्याग सप्ताह! नजर मात्र लोकसभेच्या तिकिटावर

उमेश घोंगडे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे : सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्याच्या निमित्ताने पुण्यातील कॉंग्रेसचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार मोहन जोशी यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे .गेल्या चौदा वर्षापासून दोन ते नऊ डिसेंबर या सप्ताहात माजी आमदार जोशी विविध कार्यक्रम घेतात. मात्र यावेळी निवडणुकीचा संदर्भ असल्याने `त्यागा`च्या निमित्ताने त्यांनी तिकिटासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी अनेक कॉंग्रेस नेत्यांना या कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले आहे. 

पुण्याची जागा गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसकडे होती. पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसकडे असलेली ही एकमेव जागा आहे. मात्र या जागेवर यावेळी राष्ट्रवादी दावा करीत आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला दिली जाणार नाही, असे पक्षाच्यावतीने अनेकवेळा जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून पुण्यातून कोण लढणार यावर तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. जी नावे चर्चेत आहेत. त्यात जोशी यांचाही समावेश आहे. त्यांनी १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून जोशी यांनी निवडणूक लढविली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी आपल्याला पक्ष संधी देईल, असा जोशी यांचा दावा आहे. 

तीन डिसेंबरला स्वत: जोशी यांचा वाढदिवस असतो. पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा वाढदिवस नऊ डिसेंबरला असतो. या दोन्ही दिवसांच्या मधल्या काळात गेल्या चौदा वर्षापासून जोशी यांच्यावतीने सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात. यावेळी निवडणुकीचा संदर्भ असल्याने हे कार्यक्रम थोड्या व्यापक स्वरूपात घेण्यात आले असून शहर कॉंग्रेस व शहराध्यक्ष रमेश बागवे यांना सहभागी करून घेण्यात आले. 

या सप्ताहाचे उदघाटन करण्यासाठी कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जन खर्गे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ते येऊ शकले नाहीत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, आमदार भाई जगताप व ज्येष्ठ पत्रकार तसेच खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन झाले. 
 
संबंधित लेख