mohan bhagwat visited aaphale family | Sarkarnama

साताऱ्यात मोहन भागवतांची आफळे कुटुंबियांशी 45 मिनिटे चर्चा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

या दौऱ्याबाबत पूर्ण गोपनीयता बाळगण्यात आली होती.  

सातारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास कोल्हापूरकडे जाताना साताऱ्यात जिल्हा संघ कार्यवाह मुकुंद आफळे गुरुजी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सुमारे 45 मिनिटे त्यांनी श्री.आफळे गुरुजी यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि चहापान करून ते कोल्हापूरकडे मार्गस्थ झाले.

कोल्हापूर येथील कण्हेरी मठातील कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत पुण्यातून कोल्हापूर कडे जाताना आज सायंकाळी साताऱ्यात थांबले. त्यांनी  मुकुंद आफळे यांच्या कृष्णानगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. 
यावेळी त्यांनी आफळे कुटुंबियांशी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. यानंतर चहापान घेऊन ते कोल्हापूरकडे रवाना झाले. या दौऱ्याबाबत पूर्ण गोपनीयता बाळगण्यात आली होती.  

संबंधित लेख