mohan bhagwat statement puzzale in people ratnakar mahajan | Sarkarnama

लोकांमध्ये संभ्रमासाठी "भागवतपुराण' ः महाजन 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मुंबई ः प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हौस आणि लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याची सवय असल्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेले तीन दिवस दिल्लीत केलेली भाषणे म्हणजे अनाठायी "भागवतपुराण' ठरल्याची टीका प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली. 

स्वातंत्र्य आंदोलनात कॉंग्रेसचे योगदान मोठे आहे, असे भागवत म्हणाले होते. त्यावर, "कॉंग्रेसच्या योगदानाचे राहूद्या, तुम्ही ज्या संघटनेचे सध्या प्रमुख आहात त्या संघटनेचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान काय,' असा सवाल महाजन यांनी केला. संघाचा लोकशाहीवर दृढ विश्वास असेल, तर संघाच्या कार्यप्रणालीचे एकचालकानुवर्तित्व हे वैशिष्ट्य कसे समजून घेणार, असेही महाजन म्हणाले. 
 
संबंधित लेख