mohan bhagawat nashik news | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

83 वर्षांच्या स्वयंसेवकाला सरसंघचालक म्हणाले, शंभरीला वेळ आहे ! 

संपत देवगिरे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नाशिक : "" कसे काय चालले ? ठीक आहे ना ? अशी खुशाली स्वंयसेवक चालकाना विचारतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांचे लक्ष पहिल्या रांगेत बसलेले ज्येष्ठ स्वंयसेवक मनोहर वैद्य यांच्याकडे गेले. त्यांना पाहातच ते म्हणाले, "" आपले वय काय ? त्यावर वैद्य म्हणाले, "" 83 ! यावर ते म्हणाले, अजून 100 व्हायला वेळ आहे. तुम्हाला शुभेच्छा ! 

सरसंघचालक आणि एका ज्येष्ठ स्वंयसेवकांतील संवादाने उपस्थित स्वंयसेवकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. निमित्त होते भागवत यांनी येथील मोदकेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात भरणाऱ्या मोदकेश्‍वर प्रभात शाखेला दिलेली भेट. तीस वर्षांपूर्वी प्रभाकर पाठक यांनी ही शाखा सुरू केली आहे. त्यांचीही भागवतांनी आस्थेने चौकशी केली. 

मंदिराच्या सभागृहात शाखेला नियमित येणारे स्वयंसेवक मुख्य शिक्षक सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उभे केले होते. स्वयंसेवक सभागृहाबाहेर उभे होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भागवत यांचे आगमन झाले. ते थेट सभागृहात गेले. ध्वजाला प्रणाम केला आणि स्वयंसेवकांची चौकशी केली. 

सभागृहाबाहेर ट्रस्टतर्फे नगरसेवक चंद्रकांत खोडे, उत्तमराव निरगुडे, दिलीप गुंजाळ आदींनी भागवत यांना शाल व गुलाबपुष्प देऊन आभार मानले. 

कार्यक्रम संपताच सरसंघचालकांचा ताफा नाशिक रोड रेल्वेस्थानकाकडे मार्गस्थ झाला. यावेळी नगरसेवक सतीश कुलकर्णी, डॉ. दीपाली कुलकर्णी, शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, सहकार्यवाह मंगेश खाडिलकर, डॉ. अविनाश भावसार, दिलीप क्षीरसागर, सुनील नांदेडकर, धनंजय पाटील, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते. 
 
संबंधित लेख