Mohammad Azaruddin appointed Telangana congress president | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मोहम्मद अजहरुद्दीनवर  तेलंगण कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी 

पीटीआय
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

.

नवी दिल्ली:  भारतीय क्रिकेट संघाचे  माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची आज तेलंगण कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मोहम्मद अझरुद्दीन  कॉंग्रेस पक्षाचे माजी खासदार  आहेत . आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे.

 तेलंगण प्रदेश कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी बी. एम. विनोद कुमार आणि जाफर जावेद यांच्या नियुक्तीला पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात आले. या बरोबरच इतर नऊ जणांची सरचिटणीस व सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
 

 

संबंधित लेख