modi`s silence is proof of corruption : Sharma | Sarkarnama

मोदींचे मौन हाच भ्रष्टाचाराचा पुरावा : आनंद शर्मा यांचे लाॅजिक

उमेश घोंगडे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे : देशातील सर्वच विषयात विशेषत: राफेल संरक्षण खरेदीसारख्या विषयात कितीही टीका आणि आरोप झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत. त्यांचे हे गप्प राहणेच त्यांच्या दोषीपणाचा पुरावा आहे, अशी टीका कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते व पक्षाचे प्रवक्ते खासदार आनंद शर्मा यांनी आज पुण्यात केली.

`बेटी बचाओ, बेटी पढाओ` अशा मोठ्या गप्पा मारणारे पंतप्रधान मोदी `मी टू` प्रकरणांवर गप्प कसे, असा प्रश्न खासदार शर्मा यांनी केला. 

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीवर चौफेर टीका केली. मोदी यानी सर्व पातळ्यांवर देशातील जनतेची फसवणूक केली असून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नव्हे तर प्रचारमंत्री बनले आहेत. इंधन दरवाढ रोखण्यात या सरकारला पूर्ण अपयश आले आहे. गेल्या साडेचार वर्षातील या सरकारच्या कामाची पद्धत पाहिली तर देश व अर्थव्यवस्था चालविण्याचे संपूर्ण मिस मॅनेटमेंट कसे असावे, याचे हे उत्तम उदारहरण असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा गटाच्या प्रमुखपदी अजित डोवाल यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देशाच्या संस्थात्मक व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम करणारा आहे. यातून देशाची संस्थात्मक व्यवस्था ढासळल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. या निर्णयाने तिन्ही सेनादलांचे प्रमुख, देशातील गुप्तचर संस्थांचे प्रमुख, कॅबिनेट सचिव, संरक्षण सचिव, अर्थ सचिव हे सारे महत्वाचे आधिकारी आणि संस्थांवर थेट डोवाल यांचे नियंत्रण राहणार आहे. देशाची संस्थात्मक संरचना बिघडवण्याचा हा प्रयत्न असून लोकशाहीच्यदृष्टीनेदेखील अत्यंत वाईट असल्याचे खासदार शर्मा यांनी सांगितले.

राफेलची सारी कागदपत्रे सील करण्यात यावीत अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. देशाच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या संरक्षण विषयक खरेदी व्यवहारात अनेक संशयास्पद गोष्टी आहेत. मात्र पंतप्रधान यावर बोलयाला तयार नाहीत. इंधन दरवाढीवर सरकार ठोस काही करायला तयार नाही. मन की बात करणाऱ्या मोदी यांनी लोकांच्या मनात काय आहे, याचा विचार करून जन की बात केली पाहिजे, असे खासदार शर्मा यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख