modinomix book will publish in pune | Sarkarnama

"मोदीनॉमिक्‍स"चे लवकरच पुण्यात प्रकाशन 

उमेश घोंगडे 
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना व त्यांच्या अर्थनितीचे भारतीयांवर झालेले परिणाम यासंबंधी लिहिलेले "मोदीनॉमिक्‍स' या पुस्तकाचा पुण्यातील प्रकाशनाचा कार्यक्रम लवकरच करण्यात येणार आहे. 

उज्वला गॅस योजना, जन-धन योजना तसेच नव्याने येऊ घातलेल्या आयुष्यमान भारत यासारख्या योजनांचा अभ्यास, त्याचे सामाजिक व अर्थिक परिणामांचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. 

भाजपतर्फे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय व त्याचा अमेरिकन समाजावर झालेले अर्थिक व सामाजिक परिणामांचा अभ्यास करणारे पुस्तक त्यावेळी बाजारात आले होते. त्याच धर्तीवर पंतप्रधान मोदी यांनी गेल्या चार वर्षात घेतलेले विविध निर्णय तसेच विविध योजनांचा झालेला परिणाम याचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. डॉ. विनायक गोविलकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. 

या संदर्भात "सरकारनामा'शी बोलताना शहर भाजपाचे अध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, "" पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या अनेक क्रांतीकारी निर्णयामुळे देशात एक नवी अर्थिक चळवळ उभी राहिली आहे. उज्वला गॅस योजनेचा फायदा देशातील वंचीत वर्गाला झाला आहे. जन-धन योजना, आयुष्यमान भारत योजना या सारखे अनेक ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले आहे. या पुस्तकातून या योजनांची माहिती व त्याचे भारतीय जनमाणसावर झालेले परिणाम याचा अभ्यास करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या रूपाने या योजना सामान्यांपर्यंत पोचण्यासाठी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पुण्यात लवकर घेण्यात येईल.'' 

संबंधित लेख