Modi will not fight loksabha from Karnataka : Yeddiurrappa | Sarkarnama

मोदी  कर्नाटकमधून लोकसभा लढणार नाहीत : येडियुरप्पा

पीटीआय
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

2019 ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातून लढणार असल्याचे वृत्त कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी फेटाळून लावले.

बंगळूर   : 2019 ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातून लढणार असल्याचे वृत्त कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी फेटाळून लावले.

येत्या तीन नोव्हेंबर रोजी राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची नावे येत्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत कोअर कमिटी निश्‍चित करतील, असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकमधून लढणार असल्याचे वृत्त निराधार आहे. अशा प्रकारच्या बातम्या अकारण पसरवल्या जात आहेत. यात कोणतेच तथ्य नाही, असे येडियुरप्पा म्हणाले.

स्थानिक माध्यमांनी दक्षिणेत भाजपचा दबदबा वाढावा, या उद्देशाने दक्षिणेतील एखाद्या राज्यातून नरेंद्र मोदी निवडणूक लढवू शकतात, असे वृत्त दिले होते. ते वाराणसीबरोबरच कर्नाटकातून एखाद्या मतदारसंघातून उभे राहतील, असे म्हटले होते. पंतप्रधान सध्या वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

संबंधित लेख