modi rally madhay pradesh | Sarkarnama

  कॉंग्रेसचा एकही उमेदवार विजयी होऊ देऊ नका : मोदी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

रेवा : मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडणून येणार नाही, यासाठी हुशारीने मतदान करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील मतदारांना दिला.
 
मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राज्यात प्रचार सभांचा धडाका लावला असून, आज त्यांनी रेवा येथील सभेला संबोधित केले. 

मोदी म्हणाले, ""कॉंग्रेला मतदान करण्यापूर्वी भाजपने मागील पंधरा वर्षांच्या सत्तेच्या काळात काय केले याचा विचार करा. दिल्लीत कुठल्याही राजघराण्याची चौथी पिढी यशस्वी झालेली नाही आणि कॉंग्रेसही त्यास अपवाद ठरू शकत नाही.'' मोदी यांनी या वेळी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही कौतुक केले. 

संबंधित लेख