modi means bhagwan vishnu said avadhit wagh | Sarkarnama

भाजपच्या वाघांना मोदी हे विष्णूचा अवतार असल्याचा साक्षात्कार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

मुंबई : देवाची भक्‍ती करणे हे चमचेगिरी, लांगूचालन असेल तर विरोधक तसे म्हणून शकतात. पण रामाला आणि कृष्णाला विरोध करणाऱ्यांचे काय झाले हे सर्वांनाच माहित असल्याने टिव्वट्‌टरवरील माझ्या वक्‍तव्यावर चांगली वाईट प्रतिक्रिया देणाऱ्यांची मी दखलही घेत नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्‍ता अवधूत वाघ यांनी व्यक्‍त केली आहे. मात्र वाघ यांच्या वक्‍तव्याची समाजामाध्यमांवर जबरदस्त समाचार घेण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार असल्याचे ट्‌विट भाजपचे प्रवक्‍ता अवधूत वाघ यांनी केल्यानंतर समाजमाध्यमांवर या ट्‌विटची जबरदस्त खिल्ली उडविण्यात आली. एरव्ही भाजप आणि पंतप्रधानांच्या बाजूने ट्‌विट करणारी मंडळी देखील वाघ यांच्या मदतीला धावून न आल्याने या ट्‌विटची एकतर्फीच मजा घेण्यात आली. 

या ट्‌विटविषयी वाघ यांची भावना जाणून घेतली असता ते म्हणाले,की भारतीय संस्कृतीमध्ये आपण 33 कोटी देव असल्याचे मानतो. देव ही संकल्पना आणि श्रद्धा आहे. विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामाची त्याचा परम भक्‍त असलेल्या हनुमानाने इतकी सेवा केली की त्याला देखील आपण देव मानायला लागलो. या भारतभूमीला आपण आईचा दर्जा देतो. देवीची अनेक वर्ष सेवा करणारा प्रधान सेवक गांजलेल्यांची, अल्पसंख्यांकांची, आदिवासींची, दलितांची ज्याने सेवा केली तोच आपल्यासाठी देव आहे. 

भारतभूमीला पावलेला प्रधानसेवक हेच माझ्यासाठी देवासारखे असल्याचे त्यांनी सरकारनामाशी बोलताना स्पष्ट केले. आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही त्यामुळे जे बोललो आहे ते माझ्या मनात मोदींबाबत जी भावना आहे त्या भावनेतूनच बोललो आहे असेही ते म्हणाले. 

दरम्यान, अवधूत वाघ यांच्या या टिव्वटवर आलेल्या मजेशीर प्रतिक्रियांमध्ये पौराणिक कथेचा दाखला देत कलकी अवतार सुरू असल्याने अशी क्रमवारी चुकवून पुढे जाता येणार नाही. तर नेटफ्लिक्‍सवरील सेक्रेड या मालिकेतील गायतोंडेचा संवादाचा स्क्रिन शॉट टाकण्यात आला आहे. ज्यात " आज से मै इच तुम सब लोगों का सर्वसक्‍तिसाली, इकलौता भगवान है', अशा पध्दतीने समाजमाध्यामावर या ट्‌विटचा समाचार घेण्यात आला आहे. 
 
संबंधित लेख