modi interview to ani no reservation change | Sarkarnama

जातनिहाय आरक्षण कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही : नरेंद्र मोदी 

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : जातनिहाय आरक्षण बदलण्याचा केंद्र सरकारचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी देशभरात ज्या मुद्यावरून राजकारण सुरू आहे त्यालाही स्पर्श करीत सरकारची भूमिका स्पष्ट केली. 

पंतप्रधान मोदी म्हणाले,"" देशात सध्या जमावाकडून मारहाणीच्या ज्या घटना घडत आहेत. त्या अत्यंत दुर्देवी आहेत. यावरुन कोणीही राजकारण करु नये सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता निर्माण करणे आवश्‍यक आहे. अशा मारहाणीच्या घटनांचे समर्थन होऊ शकत नाही. 

आसामबाबत बोलताना ते म्हणाले, की ज्या नागरिकांची नावे या यादीत नाहीत, त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. गेल्या वर्षी कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दाखला दिला आणि या योजनांमुळे रोजगार निर्माण झाले नाहीत का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.'' 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख