Modi has opened country's treasury for industrialists : Preeti Sharma Menon | Sarkarnama

मोदींना देशाचा खजिना उद्योगपतींसाठी खुला केला : प्रीती शर्मा-मेनन

सरकारनामा
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

अनिल अंबानी याच्याकडे चाळीस हजार कोटींचा थकबाकी आहे. यातील बव्हंशी कर्जे बॅंका एनपीए म्हणून घोषीत करण्याच्या तयारीत आहेत.

प्रीती शर्मा-मेनन

नाशिक  : पंतप्रधानी नरेंद्र मोदी स्वतःला प्रधानसेवक व नंतर चौकीदार म्हणाले. प्रत्यक्षात ते क्रोनी कॅपिटलचे प्रतिक बनले आहेत. त्यांनी देशाचा खजिना दिवाळखोरीत गेलेल्या अंबानी, अदानी यासारख्या उद्योगपतींसाठी मोकळा करून दिला आहे. अशी टिका 'आप'च्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी केला.

फ्रेंडस्  ऑफ डेमोक्रसी संस्थेने आयोजित 'राफेल विमान खरेदी- खरच मोदी दोषी आहेत का?' या विषयावर त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

श्रीमती मेनन म्हणाल्या, "अनिल अंबानी याच्याकडे चाळीस हजार कोटींचा थकबाकी आहे. यातील बव्हंशी कर्जे बॅंका एनपीए म्हणून घोषीत करण्याच्या तयारीत आहेत. अदानी ग्रुपला स्टील प्रकल्पात अशीच मदत होत आहे. आता एस्सार स्टील प्रकरणी अशीच मदत करून त्याच्या विक्रीसाठी पंतप्रधान मोदी धावपळ करीत आहेत."

"हा पैसा येतो व उद्योगपतीच्या खिशात जातो. यामध्ये बॅंकाची कवडीचीही थकबाकी मिळत नाही. हा तोटा भरून काढण्यासाठी जनतेचा पैसा असलेल्या संस्थाचा वापर होतो. यावर कितीही प्रश्न विचारले तरी ते यावर बोलत नाही. जनतेचा व देशाचा पैसा उद्योगपतींच्यासाठी वापरला जातोय. देशाच्या व्यवस्थेला मोठा धोका आहे. मोदी हे 'क्रोनी' कॅपिटलचे प्रतिक बनलेत.", असेही त्या म्हणाल्या  . 
 

संबंधित लेख