modi govt gives booster to sugar industry : Khot | Sarkarnama

मोदी सरकारचा साखर उद्योगाला बूस्टर : सदाभाऊ खोत

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पुणे ः केंद्र सरकारने साखर उद्योगांसाठी घेतलेल्या विविध निर्णयांचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वागत केले असून यामुळे या उद्योगाला संजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुणे ः केंद्र सरकारने साखर उद्योगांसाठी घेतलेल्या विविध निर्णयांचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वागत केले असून यामुळे या उद्योगाला संजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा देणारा व मंदीची मरगळ संपविणारे मोठा निर्णय केंद्र सरकारने आज घेतले अाहेत. साडे पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याद्वारे येणा-या हंगामात ऊस उत्पादन अनुदान रु. ५५ प्रती टनावरुन दुपटीपेक्षा जास्त म्हणजे रु. १३८.८० प्रती टन करण्यात आले आहे. तसेच पुढील वर्षी देशातून किमान ५० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी उदिदष्ट ठरविले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी योग्य ती पावले उचलली असून साखर निर्यातीसाठी रु. २५०० ते रु. ३००० अनुदान देण्यात येणार आहे.

याशिवाय गेल्या हंगामात झालेल्या साखरेच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे दर नियंत्रणात राहण्यासाठी उपाययोजनांतर्गत साखर कारखान्यांना देण्यात येणा-या इथेनॉलच्या दरात रु.४७ वरुन रु.५९ अशी वाढ केली आहे. यापूर्वीही जून २०१८ मध्ये मोदी सरकारने साडे आठ हजार कोटींचे पॅकेज साखर उद्योगाला जाहीर करुन मोठा दिलासा दिलेला होता. अशा प्रकारे मोदी सरकारने शेतक-यांचे व साखर उद्योगावर अवलंबून सर्व घटकांचे हित जपले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख