Modi government robs public exchequre for Rs 1,000 crore   : MLA Rahul Bondre | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मोदी सरकारने जनतेच्या तिजोरीवर 41 हजार कोटींचा दरोडा टाकला : आमदार राहुल बोंद्रे 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

अकोला : राफेल घोटाळा करून नरेंद्र मोदी सरकारने जनतेच्या तिजोरीवर 41 हजार कोटी रुपयांचा दरोडा टाकला असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेस नेते आमदार राहुल बोंद्रे यांनी केला. या घोटाळ्यामुळे मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून 2019 च्या निवडणुकीत केंद्र व राज्यातील भाजप सरकारला जनताच घरी पाठविणार असल्याचे आमदार बोंद्रे म्हणाले. 

अकोला : राफेल घोटाळा करून नरेंद्र मोदी सरकारने जनतेच्या तिजोरीवर 41 हजार कोटी रुपयांचा दरोडा टाकला असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेस नेते आमदार राहुल बोंद्रे यांनी केला. या घोटाळ्यामुळे मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून 2019 च्या निवडणुकीत केंद्र व राज्यातील भाजप सरकारला जनताच घरी पाठविणार असल्याचे आमदार बोंद्रे म्हणाले. 

येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार (ता.24) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, निखीलेश दिवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी आमदार बोंद्रे म्हणाले, की राफेल घाटोळा हा देशातील सर्वांत मोठा सुरक्षा घोटाळा असून या खरेदी व्यवहारात भ्रष्ट्राचार झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर खोटी माहिती सादर करून संसदेच्या विशेषाधिकाराच्या मर्यादा भंग केला आहे. कॉंग्रेसच्या काळात 126 विमान 526.10 करोड रुपयांप्रमाणे व्यवहार ठरला होता. मात्र, केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यावर या सरकारने हा व्यवहार 36 विमानासाठी करून 1670.70 करोड रुपयाने एक विमान खरेदी केले. अशा प्रकारे 41.205 करोड रुपयांचा चुना सरकारी तिजोरीला लावला आहे. हिंन्दुस्थान एयरोनॉटिक्‍स लिमीटेड ह्या पब्लीक सेक्‍टर मधील कंपनीकडून काढून 30 हजार करोड रुपयांचे ऑफसेट कॉन्ट्रक्‍ट आपले भांडवलदार मित्र अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला दिल्याचे आमदार बोंद्रे म्हणाले. 

विशेष म्हणजे रिलायन्स डिफेन्स कंपनी करारापूर्वी 12 दिवस अगोदर स्थापीत झाली असून अंबानींना आर्थिक फायदा पोहचविण्यासाठीच मोदी सरकारने नियमांना धाब्यावर बसवुन हा करार केला आहे. या सरकारच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा राफेल सबळ पुरावा असुन नियमितपणे कर भरणाऱ्या जनतेच्या हक्काच्या पैशावर मोदी सरकारने दरोडा टाकला आहे. याचे परिणाम 2019 च्या निवडणुकीत भाजप सरकारला भोगावे लागणार असल्याचे आमदार बोंद्रे यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख