मतांसाठी मोदी आता जातीचा आधार घेत आहेत : राज ठाकरे यांची टीका

मतांसाठी मोदी आता जातीचा आधार घेत आहेत : राज ठाकरे यांची टीका

पुणे : नरेंद्र मोदी हे आता मतांसाठी जातीचा आधार घेत आहेत, असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. मोदी यांच्या गुजरातमध्ये दलित समाजावर अन्याय होत असताना मोदी गप्प होते. मात्र आपल्यावर टीका केली म्हणजे ओबीसींवर अन्याय केल्याची हाकाटी ते आता पिटत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

भाजप आणि शिवसेनेच्या विरोधातील राज यांची पाचवी सभा खडकवासला येथे झाली. या वेळी त्यांनी नेहमी व्हिडीओ चित्रफितींचा आधार घेत मोदींना प्रश्न विचारले. माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज येथे काल झालेल्या सभेत मोदी यांनी आपण मागास जातीचे असल्याने आपल्याला टीका सहन करावी लागत असल्याचा दावा केला होता. त्याचा समाचार राज ठाकरे यांनी घेतला. 

ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे-

-लोकांना जगण्यासाठी पैसे मिळत नाहीत, मात्र मोदी पुतळयांवर कोट्यवधी रूपये खरच करीत आहे. देशाला पुतळ्यांची गरज आहे का?

-मोदींचे जैना मित्र गोमांसाची निर्यात करतात. ते त्यांना चालते? त्यावर ते काहीच बोलत नाही. मात्र गरिब दलितांचे गोहत्याबंदीत जीव गेल्यानंतरही मोदी गप्प असताता.

-मतांसाठी आता जातीचा वापर करता? मग पाच वर्षांत दलितांवरील अन्यायाचे काय?

-निवडणूक खेळण्यासाठी मोदी आता आपल्या जातीचा मुददा पुढे आहेत. ते जातीचे कार्ड वापरत आहेत.

-मोदींवर देशाने विश्वास दाखविला, तेच मोदी आता लोकांना दिलेलया स्वप्नांवर बोलत नाहीत?

-चिनी वस्तुंवर बंदीचा आव आणणारयांनी सरदार वल्लभभाई पटेलांचा कोठून तयार केला? तर चीनमध्ये! ही नाटके का करता? स्वःताचे हितसंबंध जपायचे आणि लोकांपुढे खोटे बालायचे.

-सरकारकडे पैसे नसल्याने त्यांनी रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे घेतले. सरकारकडे पैसेच नव्हते तर युध्दाची परिस्थिती निर्माण का केली?

-स्वच्छ भारतच्या नावाखाली इतका कर गोळा केलात, कुठे आहे तो पैसा? खरंच भारत स्वच्छ झाला का? त्या रामदेव बाबांच्या नादी लागून योगा दिवस साजरा केला? हे बाबा आहेत कुठे? त्यांचा व्यवसाय ५ वर्षात इतका कसा फोफावला?

-जे जे राष्ट्राध्यक्ष आले त्यांचं त्यांचं स्वागत मोदींनी गुजरात मध्ये का केलं? त्यांना फक्त गुजरातमध्येच का नेता? देशातील इतर शहरात का नाही नेलं? मोदी तुम्ही एवढे जगभर फिरलात, काय साध्य केलं तुमच्या परदेश दौऱ्यानी? काय मिळालं देशाला?

-मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अट्टहास का? बरं ह्यावर मोदी म्हणाले होते की मुंबई-पुणे बुलेट ट्रेन काय कामाची? बिझनेससाठी अहमदाबादलाच जावं लागतं. पुण्यात जायचं असेल तर फक्त शिक्षणासाठी. बरं तुमचं असं मत असेल तर मला सांगा गुजराती बांधवांना व्यापारासाठी महाराष्ट्रात का यावंसं वाटतंय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com