modi atack bjp government in oddisha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

ओडिशात भ्रष्टाचाराचा राक्षस, नरेंद्र मोदींकडून बीजेडी सरकार लक्ष्य 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

खुर्दा (ओडिशा) : ओडिशामध्ये विविध क्षेत्रांत भ्रष्टाचाराच्या राक्षसाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिजू जनता दलाच्या सरकारवर केली. मोदी यांनी आज येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन केले. 

खुर्दा (ओडिशा) : ओडिशामध्ये विविध क्षेत्रांत भ्रष्टाचाराच्या राक्षसाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिजू जनता दलाच्या सरकारवर केली. मोदी यांनी आज येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन केले. 

राज्य सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले, ""भ्रष्टाचाराच्या राक्षसाला खाद्य कोण पुरवीत आहे ? हा राक्षस सर्व क्षेत्रांत पसरला आहे. ओडिशात विकास होत नसल्याचे चित्र लपून राहिलेले नाही. शेतकरी, महिला आवाज उठवीत आहेत. राज्य सरकारने आयुष्मान भारतसारखी नागरिकांच्या आरोग्याला फायदेशीर असलेली योजनाही स्वीकारण्यास नकार दिला आहे.'' या राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. अर्थात, ईशान्य भारताच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि ओडिशा सरकार प्रथमच एकत्रित काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

"पैकांच्या विद्रोह'चा गौरव 
ओडिशामध्ये 1817 मध्ये पारंपरिक सैनिक असलेल्या पैकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरोधात विद्रोह केला होता. हा बहुधा देशातील पहिला उठाव होता. या उठावाच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे प्रकाशन केले. मोदींनी आयआयटी भुवनेश्‍वर या संस्थेच्या नव्या जागेचेही उद्‌घाटन केले.  

संबंधित लेख