modi and collector | Sarkarnama

विरोधक 2019 च्या विचारात, मोदींची तयारी 2022 ची !

श्रीकांत पाचकवडे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

अकोला : गरिबातल्या गरीब व्यक्तीचे जीवनमान उंचावित उज्वल भारत निर्माणाच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मिशन 2022' ची अंमलबजावणी सुरू केली आहे. देश विकासाच्या कार्यात प्रशासकीय यंत्रणेचा महत्वपूर्ण सहभाग लक्षात घेता मोदींनी " न्यु इंडिया मंथन' या राष्ट्रव्यापी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

अकोला : गरिबातल्या गरीब व्यक्तीचे जीवनमान उंचावित उज्वल भारत निर्माणाच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मिशन 2022' ची अंमलबजावणी सुरू केली आहे. देश विकासाच्या कार्यात प्रशासकीय यंत्रणेचा महत्वपूर्ण सहभाग लक्षात घेता मोदींनी " न्यु इंडिया मंथन' या राष्ट्रव्यापी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. "पंतप्रधानांचा " उज्वल भारत का निर्माण करेंगे, और करकेही रहेंगे' हा संदेश कृतीत उतरविण्याचा आम्ही दृढ संकल्प केला असल्याचा' मनोदय अकोल्याचे सुपूत्र असलेले आणि गुजरातमधील भरुच येथील जिल्हाधिकारी संदीप सागळे यांनी "सरकारनामा' शी बोलतांना व्यक्त केला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. " देश विकासाचे स्वप्न साकार करायचे असेल तर आधी सुरूवात आपल्या जिल्ह्यापासून करावी लागेल. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा विकास कसा करायचा याचे प्लॅनिंग तयार असणे गरजेचे आहे. केवळ कार्यालयात बसून फाईली चाळण्यापेक्षा ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन जनतेशी संवाद साधा. त्यांच्या समस्या, अडी-अडचणी समजुन घेत त्यावर तातडीने उपाययोजना करा. तरच प्रत्येक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. विकासाबद्दलची जनतेची अपेक्षा काय हे जाणून घेत जनकल्याणाच्या कामांना प्राधान्य द्या, ' असा संदेश नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 

गरीबातल्या गरीब व्यक्तींचे जीवनमान उंचावण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्याचा विकासाचा आलेख उंचावला तर देशाचा विकास आलेख उंचावेल, त्यादृष्टीने प्रत्येकाने आपली कामगिरी लोककल्याणकारी करून नवभारत निर्मितीच्या या अभियानाची 2022 पर्यंत संकल्पपुर्ती करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे जिल्हाधिकारी संदीप सागळे यांनी सांगितले. 

श्री. मोदी यांच्याशी झालेल्या संवादातून सर्व अधिकाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्याची नवचेतना मिळाली आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर, आधुनिक, डिजिटल, भ्रष्ट्राचारमुक्त, जाती, धर्म, संप्रदायाचा वादमुक्त असाच भारत घडविण्याचा आम्ही दृढ संकल्प केला आहे. नरेंद्र मोदींनी " नवभारत निर्माण करेंगे और करकेही रहेंगे' हा मंत्र दिला असून त्याच्या संकल्पपुर्तीसाठी "व्हिजन 2022' डाक्‍युमेंन्ट बनविण्याचे काम सुरू झाल्याचे संदीप सागळे यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख