mob attakc collector office in pune | Sarkarnama

पुण्यात फडणवीस यांच्या फलकाची कलेक्टरसमोर तोडफोड #MaharashtraBandh

उमेश घोंगडे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे शहरात मराठा आरक्षणासाठी आज कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या आंदोलकांनी मात्र या बंदला गालबोट लावले. हा जमाव आक्रमक झाल्याने थेट कलेक्टर कार्य़ालयात या आंदोलकांनी तोडफोड केली. शहराच्या इतर भागात मात्र तुलनेने शांतता होती. 

पुणे ः पुण्यात मराठा बंदला हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आंदोलकांनी धुडगुस घातला. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक घुसले. तेथे तोडफोड केली. नव्याने बांधलेल्या जिल्हाधिकारी कार्यालायचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनाच्या फलकाची तोडफोड जिल्हाधिकारी नवलकिशोर यांच्यासमोर करण्यात आली.

मराठा सकल समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. तेथे घोषणाबाजी झाल्यानंतर ठिय्या आंदोलन संपविण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांना तेथून निघून जाण्यास आयोजकांनी सांगितले. त्यानंतर मात्र दीड ते दोन हजार जणांचा गट आक्रमक झाला. तो पोलिसांचे कठडे तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

आंदोलकांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतरही ते शांत होत नव्हते. त्यांच्यासमोरच तोडफोड सुरू झाली. प्रवेशद्वाराजवळील केबिन फोडले आंदोलकांनी फोडले. तेथील फलक तोडले. फडणवीस यांच्या नावाची फलकाची तोडफोड केली. पोलिसही अतिबळाचा वापर या आंदोलकांवर करू शकले नाहीत.

चाकण येथील आंदोलनासारखाच हा प्रकार घडला. मोर्चा संपल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले होते. पुण्यातही असेच झाले. मोर्चा संपल्यानंतर आंदोलकांना हिंसाचारास प्रारंभ केला. 

 

वाचा संबंधित बातम्या-पुण्यात कलेक्टर आॅफिसमध्ये आंदोलकांचा धुडगुस #MaharshtraBandh

शरद पवारांच्या घरसमोर अजित पवारांची घोषणा...`एक मराठा...लाख मराठा!` #MaharshtraBandh

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख