Mns Will Won Nashik Again | Sarkarnama

जिद्दीचे दुसरे नाव राज ठाकरे, ते पुन्हा नाशिक जिंकतील : मनसेचा दावा

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पक्षाचे सचिव वसंत फडके यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी विविध मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. पूर्व मतदारसंघात 'मनसे'चे माजी महापौर (कै) उत्तमराव ढिकले आमदार होते. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब सानप येथे विजयी झाले. या पार्श्‍वभूमीवर पक्षाने आढावा बैठक घेतली. बुथनिहाय कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक : "नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ 'मनसे'चा बालेकिल्ला होता. मतदारांच्या संपर्कात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पदाधिकारी जबाबदारीने वागले तर हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेऊ. येथे मनसेचा झेंडा फडकेल. जिंकण्याची मानसिकता, प्रयत्न आणि जिद्दीचे नाव राज ठाकरे. ते पुन्हा नाशिक जिंकतीलच," असा विश्‍वास पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांनी येथे व्यक्त केला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पक्षाचे सचिव वसंत फडके यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी विविध मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. पूर्व मतदारसंघात 'मनसे'चे माजी महापौर (कै) उत्तमराव ढिकले आमदार होते. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब सानप येथे विजयी झाले. या पार्श्‍वभूमीवर पक्षाने आढावा बैठक घेतली. बुथनिहाय कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सचिव फडके यांनी एकूण वातावरणाचा आढावा घेतला. "हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पक्षाला निकराने लढा द्यावा लागेल. त्यासाठी जिद्द ठेवावी. मार्गातील धोके डोळ्यासमोर ठेवुन मार्गक्रमणाची तयारी ठेवावी लागेल. बहुसंख्य नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षातच थांबत निकराने लढा देणार असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे पुन्हा मनसेचा झेंडा फडकेल," असे सचिव फडके यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आणि संभाव्य उमेदवार राहुल ढिकले यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ते म्हणाले, "मतदारसंघातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी संवाद साधला जात आहे. हा मतदारसंघ मनसे आगामी निवडणुकीत हिसकावून घेईल. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडाव्यात." मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष अनिल मटाले, भाऊसाहेब निमसे, मुक्ता इंगळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

संबंधित लेख