MNS will meet on Thursday to decide future strategy | Sarkarnama

मनसेची चिंतन बैठक गुरुवारी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत होणार ऊहापोह

सुचिता रहाटे
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणावी तशी कामगिरी करता आला नव्हती. तसेच गेल्या काही वर्षामध्ये पक्षाचा आलेख देखील घसरत आहे. त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत नवे धोरण ठरविण्याच्या उद्देशाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कृष्णकुंज येथे पार पडणार आहे. यावेळी २०१९ मधील विधानसभा निवडणुकासंदर्भात बैठकीत ऊहापोह होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आत्ता तुम्ही माझ्याकडे येऊ नका ; मीच तुमच्याकडे येईन असे ९ मार्च रोजी पार पडलेल्या मनसेच्या ११ व्या वर्धपनदिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधान केले होते. २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा उभे राहण्याचीच भूमिका राज ठाकरे मांडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यासाठीच राज ठाकरे येणाऱ्या काही महिन्यांत राज्याचा दौरा करण्याच्या दृष्टीनेच हि बैठक घेत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

संबंधित लेख