आंदोलनाच्या माध्यमातून  मनसेचा कमबॅकचा  प्रयत्न

आंदोलनातील आक्रमकता तरुण पिढीला आकर्षित करणारी आहे . मराठी माणूस, मराठी तरुणाचा रोजगार , शेतमालाचा भाव , राष्ट्रप्रेम असे विषय माणसे भविष्यात व्यापक प्रमाणावर हाताळणार असल्याचे हे द्योतक आहे .
Raj-thakre
Raj-thakre

मुंबई :  राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध आंदोलनांच्या माध्यमातून कमबॅकचा प्रयत्न करताना दिसते आहे . आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेला पुन्हा उभारी देण्याचे राज ठाकरे यांचे डावपेच पाशवी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . 

राज्यात ठिकठिकाणी मनसेचे आंदोलन सत्र सुरू आहे. पाकिस्तान मधून कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी माणसे कार्यकर्त्यांनी झंझावाती बाईक रॅलीलक्षवेधक ठरली होती .

 झारा शोरूम मध्ये पाकिस्तानी कपडे विकल्याप्रकरणी केलेले मनसेचे ट्रेडमार्क ठरलेले   खळ्ळखट्याक  अर्थात तोडफोड आंदोलनही चर्चेचा विषय ठरले .  भावे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी केलेले पताका आंदोलन बालेकिल्ल्यात अस्तित्व दाखवून देणारे ठरले .

मुंबई आणि अन्यत्र फ्लॅटविक्री करताना बिल्डर्सनी  सहकारी आणि मांसाहारी असा भेदभाव करू नये असा इशारा मनसेने दिला आहे . मुंबई , पुणे अशा महानगरात मराठी माणसासाठी शाकाहारी वसाहतींचे निमित्त करून फ्लॅट नाकारण्याचे अनेक प्रकार घडत असून मराठी मध्यमवर्गात याबाबत तीव्र नाराजी आहे . हा मुद्दा पुन्हा राज ठाकरे यांनी हाती घेतला आहे . 


केवळ शहरी भागापुरते मर्यादित ना राहता तुरीचा मुद्दा घेऊन मनसेने ग्रामीण महाराष्ट्रावरदेखील फोकस कायम ठेवला आहे . हमी भावाची तूर खरेदी नाफेडने अचानक बंद केल्याने  राज्यातले शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांची सर्व  तूर सरकारने ५ हजार ५० रुपये या हमी भावाने विकत घ्यावी  यासाठी मनसेतर्फे  राज्यात काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून या प्रश्नावर मनसे राज्यव्यापी  आंदोलन करेल असा इशारा  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला  आहे. 

राज ठाकरे मनसेचा कमी झालेला प्रभाव विविध आंदोलनांच्या माध्यमातून पुन्हा वाढविण्याच्या प्रयत्नातं दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी 
कृष्णकुंजवर आपल्या विश्वासू आणि एकनिष्ठ सहकाऱयांच्या घेतलेल्या बैठकांना विचारमंथन झालेले असणार .

 सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर धडक आंदोलने करून मनसेने पुन्हा पाय रोवण्याची तयारी चालवली आहे . सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा मनसेचा प्रयत्न लक्ष वेधून घेणारा ठरला आहे . विविध आंदोलने हा या स्ट्रॅटेजीचा एक भाग दिसतो आहे .

आंदोलनातील आक्रमकता तरुण पिढीला आकर्षित करणारी आहे . मराठी माणूस, मराठी तरुणाचा रोजगार , शेतमालाचा भाव , राष्ट्रप्रेम असे विषय माणसे भविष्यात व्यापक प्रमाणावर हाताळणार असल्याचे हे द्योतक आहे . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com