MNS state vice president Mozar resigns | Sarkarnama

मनसे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांचा राजीनामा

उमेश भांबरे :सरकारनामा  
शनिवार, 3 मार्च 2018

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साताऱ्यातील राज्यउपाध्यक्ष संदीप मोझर यांनी आज पदाचा राजीनामा दिला. त्यांनीमनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.

सातारा  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साताऱ्यातील राज्यउपाध्यक्ष संदीप मोझर यांनी आज पदाचा राजीनामा दिला. त्यांनीमनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, व्यक्तीगतरित्या स्वत:हून राजकारणातून दूर होत असलो तरी पक्षातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांवर कायम राहून राजकीय प्रवाहात राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यासंदर्भात संदीप मोझर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, " महाविद्यालयीन जीवनापासून मी समाजकार्यात सक्रिय आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवून मलाकारावासही भोगावा लागला. मात्र तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसेचे राज्य उपाध्यक्षपद आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रमुख संघटक पदही बहाल केले."

राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना संदीप मोझर म्हणाले , " पक्षाच्या माध्यमातूनसमाजाच्या विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अक्षरश: जीवाचे रान केले. पक्षनेतृत्वानेही माझ्यावर विश्वास दाखवून माझी नेहमीच पाठराखणकेली. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात आल्यावर माझ्या निवासस्थानीही आले होते. माझ्या शब्दाखातर अनेककार्यकर्त्यांना पक्षातील जबाबदारीची पदे त्यांनी दिली. "

आपण अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट करून श्री मोझर पुढे म्हणाले ,"माझ्या व्यावसायिक नवभरारीसाठी आणि कुटुंबास पुरेसा वेळ देण्यासाठी सक्रिय राजकारणापासून अलिप्त होण्याचा निर्णय मी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.पक्षात प्रवेश करतानाच 'मनसे'हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल' ही केलेली घोषणा सत्यात आणत, यापुढे कोणताही राजकीय पक्ष, संघटनेत सक्रिय न होता व्यवसायाकडे पूर्ण वेळ लक्ष देणार आहे. भविष्यात स्वत: कोणतीही निवडणूक लढविणार नाही ."

संबंधित लेख