मनसेच्या 'मैफिली' सुन्या-सुन्या......: 'त्या' गर्दीचा नेते-कार्यकर्ते घेत आहेत शोध

शिवाजीनगर भागातील अशोकनगरीमधील 'क्‍लब हाऊस'मध्ये मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. पक्षाध्यक्ष राज स्वत: कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे गर्दीबाबत उत्सुकताही होती. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी सकाळी जेमतेम 50-60 जणांचीच 'गर्दी' पाहायला मिळाली. तास-दीड तासात हा आकडा वाढण्याची आशाही फोल ठरली. गर्दीचा आकडा जेमतेम दीडशेपर्यंतच मर्यादित राहिला.
मनसेच्या 'मैफिली' सुन्या-सुन्या......: 'त्या' गर्दीचा नेते-कार्यकर्ते घेत आहेत शोध

पुणे : निवडणुकांच्या आधी युवक-युवतींची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याभोवतीची गर्दी ओसरल्याचे चित्र त्यांच्या पुण्यातील दौऱ्यानिमित्त दिसून आले. राज्यभरातील निवडणुकांमधील मनसेच्या कामगिरीचा परिणाम राज यांच्या करिष्म्यावर झाल्याचे जाणवू लागले असून, त्याचाच भाग म्हणजे, राज यांचे कार्यक्रम, बैठकाही आता सुन्या सुन्या असल्याचे चित्र आहे.

पूर्वी राज यांच्या कार्यक्रमांना गर्दीतून वाट शोधावी लागत असायची पण, आता 'त्या' गर्दीचा शोध घेण्याची वेळ मनसे आणि या पक्षाच्या शिलेदारांवर आली आहे.  राज्यातील निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्यानंतर मनसे आणि या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तर, पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 28 वरून दोनपर्यंत घसरली. त्यानंतर आता पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षाचे अध्यक्ष राज करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून काही पदाधिकारी आणि कार्यकत्यांशी चर्चा करण्याच्या उद्देशाने गेल्या दोन दिवसांपासून ते पुण्यात आहेत.

शिवाजीनगर भागातील अशोकनगरीमधील 'क्‍लब हाऊस'मध्ये मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. पक्षाध्यक्ष राज स्वत: कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे गर्दीबाबत उत्सुकताही होती. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी सकाळी जेमतेम 50-60 जणांचीच 'गर्दी' पाहायला मिळाली. तास-दीड तासात हा आकडा वाढण्याची आशाही फोल ठरली. गर्दीचा आकडा जेमतेम दीडशेपर्यंतच मर्यादित राहिला.

महापालिका निवडणुकीआधी (2017) काही महिने राज पुण्यात येणार म्हटले की, त्या त्या परिसरात शेकडो कार्यकर्ते सकाळपासूनच जमायचे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील त्यांच्या 'राजगड' निवासस्थानाच्या आजूबाजुच्या रस्त्यांवर तर पाय ठेवायलाही जागा नसायची. याच काळात सभा आणि बैठकांना तुडुंब गर्दी होत असे. पण, निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. त्यात अनेक नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत पक्षांतर केले. निवडणुकीत राज यांचा करिष्मा कायम असल्याचे तेव्हाच्या त्यांच्या सभांवरून दिसून आले. पण ही 'मनसे गर्दी' मतांमध्ये परावर्तित झाली नाही.  

या कामगिरीचा परिणाम म्हणून की काय राज यांचा पुण्यातील करिष्माही कमी झाल्याची चर्चा आहे. ''पक्ष संघटना मजबूत करण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रमुख पदाधिकारी वगळता अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली जात आहे,'' असा दावा पुण्यातील पक्षाचे नेते करीत आहेत. पण ते न पटणारे आहे. पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे राज आणि प्रचंड गर्दी हे समीकरण भविष्यकाळात पुन्हा जुळणार का आणि कसे असा प्रश्‍न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com