mns raj thakare | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खड्ड्यांवर निबंध स्पर्धा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : खड्ड्यांचे शहर अशी ओळख बनू पाहत असलेल्या औरंगाबाद शहरातील याच खड्ड्यांचा वापर करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादवासियांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. "शहरातील खड्डे' या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करत मनसेने पुन्हा आंदोलनातील नाविन्याची परंपरा जपली आहे. लक्षवेधी आंदोलन करण्यात मनसेचा हातखंडा असल्याचे आतापर्यंतच्या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. आता या निंबध स्पर्धेला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो यावर मनसेचे यश अवलंबून आहे. 

महाराष्ट्रात एक आमदार आणि जिल्ह्यात एकमेव जिल्हा परिषद सदस्य अशी ताकद असणारी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय अस्तित्वासाठी धडपडत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत एकमेव असलेला मनसेचा नगरसेवक भाजपवासी झाल्याने सध्या महापालिकेत मनसेची पाटी कोरी आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बिडकीन जिल्हा परिषद सर्कलमधून मनसेचे एकमेव सदस्य विजय चव्हाण हे विजयी झाले होते. दरम्यान, मनसेने विविध प्रश्‍नांवर आंदोलन करत शहरवासियांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. अलीकडेच मनसेने क्रांतीचौकात शहराची वाट लावणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले होते. अर्थात या उपरोधिक आंदोलनाकडे कुणीच फिरकले नाही, पण मनसेचा हेतू साध्य झाला होता. 

खड्डे मनसेच्या जिव्हाळ्याचा विषय 
शहरातील खड्ड्यांच्या प्रश्‍नावर मनसेने यापुर्वी देखील अनेक आंदोलने केली होती. मनपा आयुक्त, उपायुक्त यांच्या घरासमोर जाऊन खड्डे खोदणे, खड्यावरून उंच उडी मारण्याची स्पधा घेऊन मनसेने अभिनव आंदोलन केले होते. आता पुन्हा खड्यांकडे मोर्चा वळवत औरंगाबाद मनसेच्या वतीने येत्या 22 ऑगस्ट रोजी शहरातील खड्डे या विषयावर खुली निबंध स्पर्धा ठेवण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अकराशे ते साडेपाच हजार रुपयापर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकळी पाच ते सात या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. आता मनसेच्या स्पर्धेला शहरवासी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

संबंधित लेख