MNS presented Nipun Vinayak a toy car | Sarkarnama

मनसेने दिली आयुक्तांना खेळण्यातील कार भेट

सरकारनामा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

यावेळी खेळण्यातील वाहने आयुक्तांना देत 'गांधीगिरी' करण्यात आली. 

औरंगाबाद:  महापालिका अधिकाऱ्यांना नवी वाहने घेण्यासाठी एक कोटी 38 लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव शनिवारी (ता. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात येणार आहे.

त्याला विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी (ता. 15) महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना निवेदन देत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.  यावेळी खेळण्यातील वाहने आयुक्तांना देत 'गांधीगिरी' करण्यात आली. 

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना प्रशासनाने वाहन खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. याविरोधात मनसेने सोमवारी आयुक्तांना निवेदन दिले. त्यात महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वाहन खरेदीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अधिकाऱ्यांच्या नावासह खेळण्यातील वाहने देऊन गांधीगिरी करण्यात आली. 
 

संबंधित लेख