mns give hands to congress | Sarkarnama

मनसेने दिला कॉंग्रेसला हात

विष्णू सोनवणे 
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

मुंबई: मनसेने कॉंग्रेसला हात दिल्यामुळेच मुंबईत आज बंदचा परिणाम दिसला. विरोधकांनी केलेला हा सर्वपक्षीय बंद असला तरी मनसेची आक्रमकता आज कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली.

विरोधी पक्षांचा घटक म्हणून मनसे मुंबईत बेधडक आंदोलनामुळे राष्टीय स्तरावर आज अधोरेखित झाला. मनसेचा कॉंग्रेसच्या बंदमधील सक्रीय सहभाग हा नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव असल्याची चर्चा आता मुंबईत सुरू झाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभादेवी येथे एका कार्यक्रमासाठी आल्याचे समजताच मनसेच्या कार्यकत्यांनी त्यांना थेट काळे झेंडे दाखविले. मनसेने ठिकठिकाणी अनोख्या पध्दतीने आंदोलने केली. बंदची घोषणा झाल्यानंतर पक्षाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जावी या उद्देशानेच मनसेने आंदोलनाची तयारी केल्याचे समजते. 

चेंबूर येथील डायमंड पेट्रोल पंपावर एक गाढव आणून इंधन दरवाढीचा अनोख्या पध्दतीने निषेध केला. दादर येथे "अच्छे दिन' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. घाटकोपर येथे रेल रोकाचा केलेला प्रयत्न, गोरेगाव येथील आंदोलन तसेच मुंबईच्या बहुतांश भागात यशस्वी झालेला बंद हा मनसेच्या आक्रमकतेमुळेच झाल्याचे दिसून आले. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आंदोलनेही झाली. मात्र तुलनेत मनसेची आंदोलने दखलपात्र ठरल्याचे दिसून आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना सतत टीकेचे लक्ष करीत आहेत. कॉंग्रेसची सत्ता असताना ते तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करीत होते. भाजपच्या धोरणांवर टीका हा आता राज यांचा राजकीय अजेंडा असल्याचे दिसत आहे. 

हाच मनसेचा कॉंग्रेससोबतच्या जवळीकीचा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आजच्या आंदोलनात मनसेने कॉंग्रेसला दिलेली साथ आगामी राजकीय समिकरणांची जुळवाजुळव असल्याची चर्चा मुंबईत सुरू झाली आहे. हिंसाचार करू नका असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे मनसेचे आज कोणताही हिंसाचार केला नसल्याचे दिसून आले. 

टॅग्स

संबंधित लेख