MNS Corporator Follows Up Proposal given by Ex Corporator wife | Sarkarnama

नगरसेवक पत्नीच्या नामकरणाच्या ठरावाची नगरसेवक पतीकडून अंमलबजावणी

उत्तम कुटे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

सचीन चिखले असे साडेतीन वर्षे पाठपुरावा करणाऱ्या मनसेच्या नगरसेवकाचे नाव आहे. ते त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक आहेत. गेल्या टर्ममध्ये (2012 ते 2017) त्यांच्या पत्नी अश्विनी या मनसेच्या नगरसेविका होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रभागातून सुरु होणाऱ्या बीआरटी (दापोडी ते निगडी) सेवेतील निगडी बस टर्मिनलसाठी लोकशाहीर अण्णासाहेब साठे यांचे नाव देण्याचा हा प्रस्ताव दिला होता.

पिंपरी : पत्नीने नगरसेविका असताना केलेल्या बस टर्मिनल नामकरण ठरावाचा पाठपुरावा नंतर नगरसेवक झालेल्या त्यांच्या पतीने करून त्याची अंमलबजावणी करून घेतल्याची दुर्मिळ घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. त्यासाठी साडेतीन वर्षे लागली. योगायोगाची बाब म्हणजे त्यावेळच्या या मनसे नगरसेविकेच्या प्रस्तावाला अनुमोदक त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक राहूल जाधव होते. सध्या ते महापौर आहेत. त्यांच्यात हस्ते या बीआरटी सेवा व बस टर्मिनलचे नामकरण नुकतेच (ता.24) झाले

सचीन चिखले असे साडेतीन वर्षे पाठपुरावा करणाऱ्या मनसेच्या नगरसेवकाचे नाव आहे. ते त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक आहेत. गेल्या टर्ममध्ये (2012 ते 2017) त्यांच्या पत्नी अश्विनी या मनसेच्या नगरसेविका होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रभागातून सुरु होणाऱ्या बीआरटी (दापोडी ते निगडी) सेवेतील निगडी बस टर्मिनलसाठी लोकशाहीर अण्णासाहेब साठे यांचे नाव देण्याचा हा प्रस्ताव दिला होता.

त्यावेळी मनसेचे चार नगरसेवक पालिकेत होते. त्यापैकी जाधव यांनी त्याला अनुमोदन दिले. नंतर हा प्रस्ताव संमत झाला. मात्र, हा बीआरटी मार्ग रखडला. न्यायालयीन कज्यात अडकला. दहा वर्षानंतर एक हजार कोटी रुपयांचा हा मार्ग नुकताच पूर्ण झाला. शुक्रवारी त्याचे उदघाटन महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते झाले. (दरम्यानच्या काळात मनसेत असलेले जाधव हे गेल्यावर्षी भाजपमध्ये दाखल होऊन पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले होते).

दरम्यान, हा बीआरटी मार्ग मेट्रोच्याच मार्गावर (निगडी ते स्वारगेट) आहे. त्यामुळे बीआरटी मार्गातच या उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रोचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे बीआरटी सुरु झाली असली, तरी तिला तिची डेडीकेटेड लेन (स्वतंत्र मार्गिका) राहिलेली नाही. त्यामुळे ती इतर बससेवेसारखीच काही अंतर धावते आहे. त्यामुळे प्रवाशांत गोंधळ आहे. रस्त्याच्या मध्ये असलेल्या बीआरटीच्या थांब्यावर थांबायचे की इतर बससाठी असलेल्या कडेच्या थांब्यावर उभे राहायचे यावरून प्रवाशांत गोंधळ आहे. 

कारण मेट्रो बीआरटी मार्गात घुसल्याने (मेट्रोचे काम) काही ठिकाणी बीरआटी ही इतर बससाठी असलेल्या नेहमीच्या मार्गातून धावत आहे. अगदी सर्व्हिस रोडवरून तिला धावावे लागत आहे. परिणामी वेगात विनाअडथळा सुरक्षित प्रवासाचा तिचा हेतू सफल झालेला नाही. सुरक्षेच्या मुद्यावरूनच या मार्गाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मेट्रो धावू लागल्यानंतर बीआरटीचा हा मार्ग मोडीतच निघणार आहे. त्याला आताच लागलेल्या घरघरीतून दुजोराही मिळतो आहे. त्यामुळे जनतेचे एक हजार कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती आहे.

संबंधित लेख