मनसेच्या कार्यकर्त्यांचा मंत्रालयावर सर्जिकल स्ट्राईक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली या भागात सध्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, कल्याणमधील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाची सरकारला जाणीव व्हावी यासाठीच हा रस्ता खोदल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं.
मनसेच्या कार्यकर्त्यांचा मंत्रालयावर सर्जिकल स्ट्राईक

मुंबई - मुंबईत पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी आणि राज्यकर्त्यांना या खड्ड्या्ंची जाणीव करुन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल मध्यरात्री थेट मंत्रालयावर धडक मारली. मंत्रालयासमोरचा पदपथ खणण्याचा या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली या भागात सध्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, कल्याणमधील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाची सरकारला जाणीव व्हावी यासाठीच हा रस्ता खोदल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, ''मंत्रालयावर सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या महाराष्ट्रसैनिकांचे अभिनंदन. मंत्रालयासमोर खड्डे करणाऱ्या महाराष्ट्रसैनिकांना अटक केलीत, आता महाराष्ट्रभर खड्डे करणाऱ्यांना कधी अटक करणार?", असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com