मनसे अकोला कार्यकारिणी : नावे निश्चित घोषणेची प्रतीक्षा   !

Raaj_Thakre
Raaj_Thakre

अकोला :   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकोला शहर व जिल्हा कार्यकारिणीसाठी  नावे निश्चित झसली असून आता   प्रतीक्षा  घोषणेची आहे .     

मनसेची नवी टीम तयार झाली आहे. ३ जिल्हाध्यक्ष व २ शहराध्यक्षांकडे कारभार सोपवला जाणार आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघासाठी रामा उंबरकर यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार असून, अकोला पूर्व व पश्चिमसाठी माजी नगरसेवक पंकज साबळे यांचे नाव निश्चित आहे. याशिवाय बाळापूर व अकोट मतदारसंघासाठी एक जिल्हाध्यक्ष असेल. शहराध्यक्षपदासाठी अकोला पश्चिममध्ये राकेश शर्मा किंवा सौरव भगत यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. तर अकोला पूर्वसाठी आदित्य दामले यांचे नाव निश्चित मानले जात आहे.   

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर व जिल्हा कार्यकारिणीच गठित झाली नाही. दोन वेळा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र दोन्ही वेळचा मुहुर्त टळला. आता नव्या मुहुर्ताची प्रतीक्षा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यकारणीची  व   पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा  ७ ऑक्टोबरला होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच हा मुहुर्त  टळला होता.   त्यानंतर १० ऑक्टोबरला मनसेची जिल्हा टीम घोषित केला जाण्याची शक्यता होती; मात्र हा मुहुर्तही साधला गेला नाही.

आता राज ठाकरे यांच्या अकोला दौऱ्यापूर्वी मनसेची टीम घोषित केली जाते की  राज ठाकरे आल्यानंतरच त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा २३ ऑक्टोबर रोजी अकोला दाैरा आहे. त्या अनुषंगाने पूर्व तयारीबाबत चर्चा व नियोजन करण्यासाठी मनसेचे उपाध्यक्ष प्रवीण मरगच व राजेश कदम अकोला येथे येत आहेत.

१३ ऑक्टोबर रोजी हे दोन्ही पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी येत आहेत. यावेळीच अकोला जिल्हा व शहर कार्यकारिणी घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी या बैठकीला सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com