mmi corporatio matim arrested | Sarkarnama

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला अटक 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देत विरोध दर्शवणाऱ्या एमआयम नगरसेवक सय्यद मातीन यास पोलिसांनी अटक केली आहे. 

तसेच मातीन यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरुद्ध कालरात्री (शुक्रवारी) उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मातीन यास बेदम मारहाण झाल्याने त्यास येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात (घाटी) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी त्यास अटक करण्यात आली होती. अटकेत असलेल्या मातीनला येथील न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. मातीन याला अटक केल्याने त्याच्या समर्थकांचा मोठा जमाव जमला होता. 

तसेच सय्यद मतीनने दिलेल्या तक्रारीवरून भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, उपमहापौर विजय औताडे यांच्यासह अन्य नगरसेवकांविरोधात कलम 323, 506, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख