mlc vinayak mete demands three day session | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

अंत पाहू नका; तीन दिवसांचे अधिवेशन घ्या : विनायक मेटे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

मराठा आरक्षण आंदोलनामुळे अनेक राजकीय पक्ष आपापल्या सोयीची भूमिका घेत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. त्यामध्ये सर्वच पक्षांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असे आमदार विनायक मेटे यांनी म्हटले आहे. 

बीड : मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे अशी अनेक वर्षांपासूनची भावना आहे. त्यासाठी समाजाने संघर्षही केला आहे. परंतु, कायद्याचा बागुलबुवा उभा करुन समाजाला आरक्षण व नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे. मराठा समाजाचा अंत पाहू नका, सन्माननिय तोडगा काढावा. मराठा समाज आरक्षणावर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पत्रकाद्वारे केली. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी वर्षांपासूनची मागणी असून त्यासाठी लढाही सुरु आहे. सध्या सुरु असलेला संघर्ष त्याचाच परिपाक असल्याचेही आमदार मेटे यांनी म्हटले आहे. 

मराठा समाजात जन्म घेतला हा गुन्हा आहे का, त्याची शिक्षा सरकार अन्यायातून देत आहे, मराठा समाजाच्या मुलांना नोकरी मिळत नाही, शिक्षण शुल्क परवडत नाही, इतर सवलतीही मिळत नाही हा सर्व अन्याय समाजातील मुले उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. या अन्यायाच्या विरोधात समाजासोबत मागच्या 32 वर्षांपासून समाजासोबत लढा देत असून प्रत्येक सरकारने थातुर मातुर उत्तरे देऊन वेळ मारुन नेल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला. याचा संताप मराठा समाजामध्ये दिसत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन राज्य मागासवर्गीय आयोग, उच्च न्यायालय व इतर बाबींचा दाखला न देता समाजाला विश्वास आणि कायदेशिल आरक्षण व नोकरीत 16 टक्के आरक्षण ठेवण्याबाबत पावले उचलावीत असे आवाहनही त्यांनी पत्रकातून केले आहे. 

संबंधित लेख