mlc satej patil press in kolhapur | Sarkarnama

माझे ध्येय निश्‍चित : सतेज पाटील

युवराज पाटील
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कोल्हापूर : राजकारणातील आपले ध्येय निश्‍चित असून त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी आज सांगितले. 

कृषि प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय भाष्य केले. 

डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये केलेला नुकताचु प्रवेश, आमदार पाटील यांनी काल नवउर्जा महोत्सवात पालकमंत्र्यांचे केलेले कौतुक या पार्श्‍वभूमीवर त्यांची भुमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

आमदार पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीपर्यंत आपण कोणतेही भाष्य करणार नाही. आपले ध्येय निश्‍चित आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. 

डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घेऊन आमदार पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी खासदार धनजय महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना पाटील हे विरोध करणार हे जगजाहीर होते. विरोध कमी व्हावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने डी. वाय. पाटील यांना सोबत घेतले. डी. वाय. पक्षात आल्यानंतर पाटील यांची कोंडी होणार हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना ठाऊक होते. वडील राष्ट्रवादीत पुत्र कॉंग्रेसमध्ये अशी संभ्रमावस्था निर्माण करणे हा यामागे हेतू होता. या पार्स्वभूमीवर पाटील यांनी आपले ध्येय निश्‍चित असल्याचे म्हंटले आहे. नेमके ध्येय काय आहे हे लोकसभा निवडणुकीवेळीच स्पष्ट होईल. 
 

संबंधित लेख