mlc narendra patil about talk with udyanraje | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंशी चर्चा करावी : नरेंद्र पाटील 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे: मराठा आंदोलनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे. 

आज नवी मुंबईत झालेल्या आंदोलनात आगडोंब उसळला. त्यासंबंधाने बोलताना आंदोलनात वेगळे लोक घुसल्याचा आरोप पाटील यांनी केला. चिघळलेले आंदोलन शांत करण्यासाठी आणि आरक्षणासाठी प्रश्‍न सोडविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र पाटील यांच्या मागणीनंतर काहीवेळात खासदार नारायण राणे चर्चेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गेले. 

संबंधित लेख