mlc naraendra patil | Sarkarnama

आमदार नरेंद्र पाटील यांची राष्ट्रवादी मेळाव्याकडे पाठ ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 जुलै 2017

माथाडी कामगारांचे नेते आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य नरेंद्र पाटील यांनी रविवारी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली. नरेंद्र पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला या अनुपस्थितीने बळ दिले आहे. 

नवी मुंबई: माथाडी कामगारांचे नेते आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य नरेंद्र पाटील यांनी रविवारी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली. नरेंद्र पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला या अनुपस्थितीने बळ दिले आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पक्षसंघटना, विशेषत: विविध सेलच्या कामांचा ते आढावा घेत आहेत. रविवारी नवी मुंबईत पक्षाचा मेळावा झाला. या मेळाव्याला माजी मंत्री गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, चित्रा वाघ यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. नवी मुंबईतील मेळावा हा गणेश नाईक यांच्या टीमने यशस्वी केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलताना गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ज्या नेत्यांना सध्या काही काम नाही. ज्यांना स्वतः चे झाकून ठेवायचे आहे, अशांकडून भाजप प्रवेशाबाबतच्या अफवा पेरल्या जात असल्याचे तटकरे म्हणाले. 
दरम्यान, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे खाजगी कारणाने मेळाव्याला येऊ शकले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

संबंधित लेख