मुंबईतील पदवीधर पावसाने घरातच, तर नाशिकमध्ये विक्रमी मतदान 

मुंबईतील पदवीधर पावसाने घरातच, तर नाशिकमध्ये विक्रमी मतदान 

मुंबई ः विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज काही अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. मात्र, मुंबई पदवीधर मतदारसंघात जेमतेम 53.23 टक्‍के मतदान झाल्याने पदवीधरांना पावसाने घरातच रोखल्याचे स्पष्ट झाले आहे;

नाशिक शिक्षक मतदारसंघात विक्रमी असे 92.30 टक्‍के मतदान झाले असून शिवसेना व शिक्षक आघाडीच्या उमेदवारांत कमालीची चुरस असल्याचे संकेत आहेत. 

आज मुंबई पदवीधर व शिक्षक तर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघात मतदान पार पडले. नाशिक शिक्षकसाठी शिवसेना, भाजप व कॉंग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत शिक्षक आघाडीच्या उमेदवारांत सामना आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि सध्या भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आणि शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात सामना झाला. या मतदारसंघात सरसरी 73.89 टक्‍के मतदान झाले आहे.

मुंबई पदवीधरमध्ये भाजप व शिवसेनेत सरळ लढत असल्याचे चित्र होते. मात्र मतदानाचा टक्‍का घसरल्याने सर्वच पक्षाचे उमेदवार चिंतेत आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेने पहिल्यांदाच उमेदवार देत आव्हान उभे केले. 

मतदानाची टक्‍केवारी 
नाशिक शिक्षक- 92.30 
मुंबई शिक्षक- 83.26 
मुंबई पदावीधर- 53.23 
कोकण पदवीधर- 73.89 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com