mlc aanandrao patil helps todkar family | Sarkarnama

रोहन तोडकरच्या कुटुंबीयांना कॉंग्रेस आमदाराची मदत 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : मराठा समाजाच्या महिलांनी आरक्षणासाठी येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनास कॉंग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांनी पाठिंबा दिला. नवी मुंबई येथील आंदोलनादरम्यान मृत्यु पावलेल्या खोनोली -चाफळ (ता. पाटण) येथील युवक रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 

आमदार पाटील म्हणाले, मी एक मराठा म्हणून आंदोलनात सहभागी झालो आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन तातडीने आरक्षण द्यावे. मराठा म्हणून माझा नेहमीच मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा राहिल. कॉग्रेसच्या आमदारांनी सामुहीक राजीनामा देण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. नवी मुंबई येथील आंदोलनादरम्यान खोनोली -चाफळ येथील युवक रोहन तोडकर याचा मृत्यु झाला. त्याच्या कुटुंबियांना मी 2 लाखांची मदत देणार आहे. रोहन तोडकर याची हत्या करणाऱ्या संशयीतांना आठवड्यानंतरही अटक का करण्यात आली नाही ? शासनाने या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे पाटील म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख