आजी माजी आमदारांना एसटीतून मोफत प्रवास : रावते

आजी माजी आमदारांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या (अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन) बसमधून महाराष्ट्र व आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येणार आहे.
Raote_ST
Raote_ST

मुंबई : महाराष्ट्राच्या आजी/माजी विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकाऱ्यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. 

त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सवलतीचे निर्देश असलेले परिपत्रक आज काढण्यात आले. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे, सन्माननीय व्यक्ती विधान परिषद अथवा विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या (अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन) बसमधून महाराष्ट्र व आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येणार आहे. सदर प्रवासासाठी संबंधित विधिमंडळ सदस्याकडे विधान मंडळ सचिवालयाने पुरविलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com