आमदार विजय औटी यांचे उपाध्यक्षपद " औटघटकेचे'

आमदार विजय औटी यांचे उपाध्यक्षपद " औटघटकेचे'

मुंबई : तब्बल चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना मिळालेले विधानसभेचे उपाध्यक्षपद औटघटकेचे ठरणार आहे. कारण औटी यांना प्रत्यक्ष काम करण्यास जेमतेम दोन अधिवेशनांचा कालावधी मिळेल.

तेराव्या विधानसभेची मुदत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये संपत असून त्याआधी चौदावी विधानसभा अस्तित्वात येईल. या दरम्यान विविधमंडळाची दोन अधिवेशन पार पडतील आणि त्यांचा कालावधी एक-दोन आठवड्यांचा असेल.

विधानसभेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारी 2019 पासून सुरू होणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार्या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे अधिवेशन काही दिवसाच चालण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन होईल. या अधिवेशनात राज्याचा सन 2019-20 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. हे अधिवेशन तेराव्या विधानसभेसाठी शेवटचे असेल. कारण तोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात होईल. त्यामुळे पुढील वर्षी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होण्याची शक्‍यता कमीच आहे.  निवडणूक वर्षात अधिवेशनाचा कालावधी कमी राहणार असल्याने विजय औटी यांना प्रत्यक्ष सभागृहात काम करण्यास फार संधी मिळणार नाही.


विधानसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याची प्रथा राज्यात होती. परंतु, 1999 मध्ये कॉंग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर ही प्रथा बंद झाली. आघाडी सरकारमध्ये हे पद कॉंग्रेसकडे गेले आणि 1999 ते 2014 या दरम्यान प्रमोद शेंडे, मधुकरराव चव्हाण, वसंत पुरके यांनी उपाध्यक्षपद भूषवले. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना कॉंग्रेसच शरद तसरे यांची विधानसभा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com