mla uday samant about shivsens workers study | Sarkarnama

वाजपेयींच्या पुस्तकांचा 10 टक्के अभ्यास केलातरी शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

रत्नागिरी : अटलबिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे. त्याचा 10 टक्के अभ्यास शिवसैनिकांनी केल्यास शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल, असे मत आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले. 

रत्नागिरी : अटलबिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे. त्याचा 10 टक्के अभ्यास शिवसैनिकांनी केल्यास शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल, असे मत आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले. 

पावस जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, "केंद्र सरकारने सर्व योजना ऑनलाईन केल्या. त्यासाठी लागणाऱ्या कनेक्‍टिव्हिटीसाठी 25 लाखांची तरतूद केली. "सरकार' नावाच्या योजनेमार्फत सर्व योजना गावात पोचल्या आहेत. सात-बारा उताऱ्यांसह दिल्ली, मुंबई, महाराष्ट्रातील, केंद्र, राज्याच्या सर्व योजना गावांपर्यत पोचल्या आहेत. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींपर्यंत त्या पोचण्याचे प्रभावी माध्यम तयार झाले आहे.' 

या वेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किरण सामंत, प्रमोद शेरे, दीपक सुर्वे, बंड्या साळवी, शिल्पाताई सुर्वे, सुभाष पावसकर, विनया गावडे, कांचन नागवेकर, आरती तोडणकर, विभागप्रमुख किरण तोडणकर, तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष विजय चव्हाण आदी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख