mla suresh halwankar criticise raju shetty in warnanagar | Sarkarnama

ज्यांनी सांगितले 'कार्यक्रम' करा, त्यांच्याशीच शेट्टींची नाळ जुळली आहे! 

सदानंद पाटील
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : स्वतःच्या खासदारकीसाठी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत केवळ एका जागेवर ज्यांनी समाधान मानले. ते संघटनेचे नेते काहीही करा पण मला खासदार करा, यासाठी धडपडत आहेत, असा टोला आमदार सुरेश हाळवणकर यांनी खासदार राजू शेट्टी यांना लावला.

वारणानगर येथे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते.

आमदार हाळवणकर म्हणाले, तत्कालीन मंत्री राहिलेल्या जयंत पाटील यांनी संघटनेच्या नेत्यांचा कार्यक्रम करा असा आदेश दिला, आज त्यांच्याशी यांची नाळ जुळली आहे. या सर्वांच्या मदतीने कमळावर तणनाशक फवरणार असल्याचे सांगत आहेत. मात्र कमळ हे फुल आहे आणि यावर शेतकरी कधी तणनाशक फवारत नाहीत, याची शेतकरी नेता असलेल्या शेट्टी याना माहिती नसल्याचा टोला त्यांनी मारला.

संबंधित लेख