MLA Suresh Gore has no chance in elections : Ramdas Thakur | Sarkarnama

गोरे निवडून येणे तर लांबच त्यांच्या भाषणाला टाळ्या तरी पडतात  का ? : रामदास ठाकूर

रुपेश गुट्टे पाटील 
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

एमआयडीसीमधील दादागिरी मोडीत काढणार असून एमआयडीसीत हस्तक्षेप करणार नाही की कुटुंबासाठी कामे मागणार नाही .

- रामदास ठाकूर

आंबेठाण  : " खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे हे स्वार्थी आहेत. २००९ ला मला मदत न करता गोरे बॅग भरून केरळला गेले. परंतु २०१४ ला मतविभागणी होऊ नये म्हणून मी अर्ज भरला नाही म्हणजे एक प्रकारे त्यांना मदत केली.

आमदार गोरे यांनी मला निष्ठा शिकवू नये. नारायण पवारांनी अठरा पगड जातींशी जी आत्मीयता निर्माण केली होती ती मी पुन्हा निर्माण करणार आहे," असे स्पष्ट मत शिवसेनेचे  रामदास ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

यानिमित्ताने शिवसेनेतील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे .  मी नारायणराव पवारांचा चेला आहे असे सांगत २०१९ ला मी शंभर टक्के उमेदवार म्हणून उभा आहे अशी माहिती रामदास ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

" मला जर शिवसेना पक्षाने तिकीट दिले तर आताच्या आमदारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल असा मला विश्वास असून तालुक्यावरील शिवसेनेचा झेंडा कायम ठेवील.मला समाजाची निस्वार्थी सेवा करायची आहे. आमदार पदातून स्वतःच्या कुटुंबासाठी काहीही मिळवणार नाही."

"तसेच आमदारकीचे मानधन घेणार नसून यापूर्वी देखील मी पद असताना मानधन आणि सुविधा नाकारल्या आहेत. एमआयडीसीमधील दादागिरी मोडीत काढणार असून एमआयडीसीत हस्तक्षेप करणार नाही की कुटुंबासाठी कामे मागणार नाही," अशीही स्पष्ठ भूमिका ठाकूर यांनी मांडली.

आमदार गोरे यांना तिकीट दिले तरी ते निवडून येणार नाही असा विश्वास व्यक्त करीत तालुक्यातील जनतेचा सर्व्हे करून पक्षाने तिकीट द्यावे असा गर्भित इशारा दिला. गोरे यांच्या सूचक वक्तव्याचा समाचार घेताना तिकीट मागण्याची नेमकी पद्धत कोणती ?असा सवाल करीत यांच्यात नक्की काय परिपक्वता आहे ? असा प्रतिसवाल ठाकूर यांनी केला.

मला दादांबद्दल काही बोलायचे नाही असे सांगत गोरे यांनी घडा घडा बोलले पाहिजे,त्यांना बोलणे विकत घ्यावे लागत आहे की काय असे वाटते.मेळाव्यात  त्यांच्या भाषणाला टाळ्या तरी पडल्या का?असा प्रश्न उपस्थित केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख